धर्मप्रवास

श्री अष्टविनायक दर्शन यात्रा – श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक)

श्री सिद्धिविनायक हे गणेशस्थान नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सिद्धटेक या गावी आहे.

  • सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वे स्टेशन म्हणजे दौंड, दौंड ते सिद्धटेक अंतर २० कि. मी. आहे. दौंडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर नाव चालू असते.
  • पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावर दौडच्या पुढे बोरीबेल स्टेशन लागते. तेथून १० कि. मी. सिद्धटेक आहे. मात्र हा प्रवास पायी अगर बैलगाडीने करावा लागतो.
  • श्रीगोंदे रेल्वे स्टेशनवर उतरून सिद्धटेकचा प्रयास एम. टी. बसने करता येतो. श्रीगोंदे ते सिद्धटेक अंतर ६४ कि. मी. आहे.
  • दौड राशिन एस. टी. बसने जलालपूरच्या पुढे सिद्धटेक फाटा फुटतो. येथे उतरून पायी फक्त २ कि. मी. अंतर आहे.
  • पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकावरून सिद्धटेकला जाण्यासाठी दुपारी एस. टी. बस आहे.
  • पुणे स्वारगेटहून पुणे करमाळा व्हाया दौंड अशी एक यस सकाळी जाते. सिद्धटेक फाट्यावर उतरून पायी जावे लागते.

श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रूंद आहे. मूर्ती उत्तराभिमुखी गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. एक मांडी घातलेली असून त्यावर ऋद्धिसिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर सूर्य, चंद्र, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. उजव्या व डाव्या बाजूस जयविजय आहेत.

 

 

 

सर्व काही मराठी

सर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप. हे संकेतस्थळ पूर्णतः मराठी च्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहील.

Related Articles

Back to top button