धर्म प्रवास

श्री अष्टविनायक दर्शन यात्रा – Ashtavinayak Darshan Marathi

ashtavinayak darshan marathi

॥ श्री अष्टविनायक दर्शन यात्रा ।।

Ashtavinayak Darshan List/Route/Map/Sequence in Marathi

महाराष्ट्रातील अष्टविनायकांचे स्थान माहात्म्य मुद्गल आदि पुराणात दिलेले आहे. गणपतीची उपासना ही पूर्वापार चालत आलेली असून सुखकर्ता व दुखहर्ता अशा गणेशाची आठ जागृत शक्तिपीठे महाराष्ट्रात आहेत. प्रत्येकाने एकदा तरी अष्टविनायकांचे दर्शन घ्यावे.

 

स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेधरं सिद्धिदम् ।

बल्लाळं मुरुडं विनायकं मदं चिंतामणि स्थेवरे ॥

लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरे ।

ग्रामे रांजण संस्थितो गणपते कुर्यात् वयोमंगलम् ॥

 

अष्टविनायक यात्राक्रम स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे असा (१) मोरगांव (२) सिद्धटेक (३) पाली (४) महड (५) थेऊर (६) लेण्याद्री (७) ओझर (८) रांजणगांव

परन्तु वरील क्रमाप्रमाणे गेल्यास बराचसा प्रवास उलटसुलट होतो म्हणून आम्ही यात्रेकरूंच्या सोयीसाठी खालीलप्रमाणे क्रम देत आहोत.

     (१) श्री मयुरेश्वर- मोरगांव, ता. पुरंदर, पुणे

     (२) श्री चिंतामणी – थेऊर, ता. हवेली, जि. पुणे

     (३) श्री सिद्धिविनायक सिद्धटेक, ता. कर्जत, जि. नगर

     (४) श्री महागणपती- रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे

     (५) श्रीविघ्नेश्वर ओझर, ता. जुन्नर, जि. पुणे

     (६) श्री गिरिजात्मज लेण्याद्री, ता. जुन्नर, जि. पुणे

     (७) श्री बल्लाळेश्वर – पाली, ता. सुधागड, जि. रायगड

     (८) श्री वरदविनायक महड, ता. खालापूर, जि. रायगड

About the author

सर्व काही मराठी

सर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप. हे संकेतस्थळ पूर्णतः मराठी च्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहील.