श्री विघ्नेश्वरास अष्टविनायकात फार मानाचे स्थान आहे. हे अत्यंत रमणीय स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नारायणगावपासून ८ किलोमीटरवर ओझर हे गाव आहे.
- पुणे नाशिक रोडवरील नारायणगाव पासून ८ कि. मी. अंतरावर ओझर हे क्षेत्र आहे.
- जुन्नर ते ओझर अंतर साधारण ८ ते १० कि. मी. असून एस. टी. नाही. इतर वाहने मिळू शकतात.
- जुन्नर अथवा नारायणगावला जाण्यास पुणे येथील शिवाजीनगर स्थानकावर गाड्या मिळतात.
श्री विघ्नेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, पूर्णाकृती व आसन मांडी घातलेली आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणके, कपाळावर चकचकीत हिरा व बेंबीत खडा बसविला- आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस ऋद्धि सिद्धिच्या पितळी मूर्ती आहेत. देवाची मूर्ती डौलदार कमानीत आहे.
One Comment