धर्मप्रवास

श्री अष्टविनायक दर्शन यात्रा – श्री मयुरेश्वर (मोरगांव)

महाराष्ट्रातील अष्टविनायकात मोरगाव हे प्रमुख व गाणपत्यसंप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. यालाच ‘भूस्वानंदभुवन’ असे म्हणतात.

मोरगाव हे क्षेत्र पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात कन्हा नदीच्या काठावर आहे. पुणे ते मोरगाव अंतर ६४ कि. मी. आहे.

  • पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावरून एस. टी. गोड्या सुटतात,
  • जेजुरी रेल्वे स्टेशनवर उतरूनही मोरगावला एस. टी. ने जाता येते. जेजुरी ते मोरगाव अंतर १८ कि. मी. आहे.
  • दक्षिण रेल्वेच्या नीरा स्टेशनवर मोरगावला एस. टी. ने जाता येते.
  • पुणे दौंड मार्गावरील केडगाव स्टेशनवरून मोरगावला एस. टी. ने जाता येते.
  • पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासून ५५ कि. मी. चौफुला गाव आहे. तेथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर २३ कि. मी. आहे.

गाभान्यातील मयुरेश्वराची मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. मूर्ती बैठी व डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसविले आहेत, मस्तकावर नागराजाची फणा आहे. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस सिद्धिबुद्धिच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहे.

गणपतीसमोर आपल्या पुढच्या दोन पायात लाडू घेऊन उभा असलेला एक भला मोठा दगडी उंदीर आहे. तसेच एका चौथऱ्यावर मोठा नंदी आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी व माघ शुद्ध चतुर्थी (गणेशजयंती) असे दोन मोठे उत्सव होतात. मोरया गोसावी दर शुद्ध चतुर्थीला मोरगावला यात्रेला जात असत, आजही माघ शुद्ध चतुर्थी व भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी चिंचवडहून मोरगावला देवाची पालखी जाते.

Photo of सर्व काही मराठी

सर्व काही मराठी

सर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप. हे संकेतस्थळ पूर्णतः मराठी च्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहील.

Related Articles

Back to top button