हे क्षेत्र पुण्याच्या उत्तरेस कुकडी नदीच्या पश्चिम तीरावर आहे. गणेशपुराणात या ठिकाणास जीर्णपूर व लेखनपर्वत अशी नावे आहेत. येथे बौद्धांने एक सुंदर लेणे आहे. म्हणून यास लेण्याद्री असे म्हणतात व विनायकाला गिरिजात्मज असे नाव आहे.
- यात्रेकरूंना जाण्यासाठी सोयीचे रेल्वे स्टेशन म्हणजे पुणे व तळेगाव
- मुंबई ते जुन्नर अशा गोड्या आहेत.
- पुण्यापासून शिवाजीनगर बस स्थानकापासून जुन्नर करिता गाड्या सुटतात, पुणे से जुन्नर व पुढे लेण्यादि ९४ कि. मी. अंतर आहे.
- तळेगाव ते जुन्नर एस.टी. ची सोय आहे.
- जुन्नर ते लेण्याद्रि साधारणपणे ८ कि.मी. आहे. टांगा किंवा रिक्षा आहेत.
हे मंदिर डोंगरात खोदलेले विस्तीर्ण लेणेच आहे. पायथ्यापासून २८३ पायऱ्या वर चढून गेले की मंदीर लागते. मूर्ती उत्तराभिमुख आहे. मुर्तीच्या उजव्या व डाव्या बाजूस हनुमान व शिवशंकर हे देव आहेत.