श्री वरदविनायक हे स्थान कुलाबा जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात महड या गावी आहे.
- या क्षेत्राला जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे कर्जत-खोपोली, कर्जत पासून महड अंतर २५ कि.मी. असून खोपोली पासून ६ कि. मी. आहे.
- मुंबई महड अंतर ८४ कि.मी. आहे.
- खोपोली-महड एस.टी. अथवा महानगरपालिकेची बस मिळू शकते.
- महङ (फाट्यापासून देवस्थान एक ते दीड कि.मी. आहे. पायी जाणे चांगले.
- पुणे-ठाणे बसने गेल्यास महड फाट्यावर उतरावे व तेथून पायी जाता येते.
गाभान्यात दगडी महिरपी नक्षीदार सिंहासनावर श्री वरदविनायकाची मूर्ती आहे. मूर्ती सिंहानापासून निराळी आहे. मूर्ती बैठी, डाव्या सोंडची व पूर्वाभिमुख आहे.