खेळ मांडला (Lyrics) बोल नटरंग
गायक | अजय गोगावले |
संगीतकार | अजय अतुल |
गीतकार | गुरु ठाकूर |
तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
हे तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला
खेळ मांडला
खेळ मांडला
खेळ मांडला, देवा
खेळ मांडला
हे, उसवलं गनगोत सारं
आधार कुनाचा न्हाई
भेगाळल्या भुईपरी जीनं
अंगार जीवाला जाळी
बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे
इनविती पंचप्रान जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा, जळलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला
खेळ मांडला