मराठी गाणी

अप्सरा आली (नटरंग) – Apsara Ali Marathi Song Lyrics – बेला शेंडे, अजय अतुल

apsara aali lyrics

अप्सरा आली (नटरंग) – Apsara Ali Marathi Song Lyrics – बेला शेंडे, अजय अतुल

 

गायक बेला शेंडे, अजय अतुल
संगीतकार अजय अतुल
गीतकार गुरु ठाकूर

हो, कोमल काया की मोहमाया, पुनवचांदनं न्हाली
सोन्यात सजले, रूप्यात भिजले, रत्नप्रभा तनू ल्याली
ही नटली थटली जशी उमटली, चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली, रत्नप्रभा तनू ल्याली
ती हसली गाली चांदनी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली

हो, छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार गुलजार
छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार गुलजार
सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार
शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी, नयन तलवार

ही रती मदभरली दाजी ठिनगी शिनगाराची
कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वार्याची
ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहुन थिजली इंद्रसभा भवताली
अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली, रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदनी रंगमहाली
अप्सरा आली, पुनवचांदणं न्हाली

About the author

सर्व काही मराठी

सर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप. हे संकेतस्थळ पूर्णतः मराठी च्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहील.