आरोग्य

गुळवेल (गिलोयचे) मुख्य ७ फायदे जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतील

गुळवेल (गिलोयचे) मुख्य ७ फायदे जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतील

सध्या सर्वपरिचित असलेल्या कोरोनाव्हायरस – साथीच्या रोगात सर्व देशभर आणि परदेशात गिलोय (गुळवेल) नामक वनस्पती विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे आणि त्यास कारणही तसेच आहे. ही औषधी वनस्पती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खरोखर खूप उपयुक्त आहे.

गुळवेल म्हणजे काय?

गुळवेल एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी बर्‍याच वर्षांपासून भारतीय औषधामध्ये वापरली जात आहे आणि ऋषीमुनीं कडून सुचविली गेली आहे. संस्कृतमध्ये गुळवेलीला अमृता म्हणून ओळखले जाते ज्याचा अर्थ “अमरत्वाचे मूळ” असा आहे म्हणजेच मुबलक औषधी गुणधर्मांमुळे युक्त असलेली वनस्पती.

गुळवेलीचे ७ आरोग्यदायी फायदे

रोग प्रतिकारशक्ती वाढवते

गुळवेल ही सर्वात प्रभावी आणि बहुमुखी आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून मानले जाते जी आरोग्याच्या अनेक समस्यांसाठी वापरली जाऊ शकते. हि रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्यात मदत करते आणि ह्या वनस्पतीमधे जैविक दृष्ट्या सक्रिय संयुगे क्षार आणि लैक्टोन देखील आहेत. गुळवेल तुमच्या’ रक्तातील साखरेची पातळी संतुलित करते आणि शरीरास डिटॉक्स म्हणजेच निर्विषीकरण करते. अशाप्रकारे गुळवेल आपल्या शरीरास नैसर्गिकरित्या मदत करते आणि शरीराची उर्जा आणि प्रतिकारशक्ती पातळी सुधारते.

ताण कमी करते

आजकाल ताणतणाव ही एक मोठी चिंतेची बाब बनली आहे आणि ह्या धकाधकीच्या जीवनात जर आपल्याला आपली परिस्थिती सुधारण्यास मदत करणारी एखादी वस्तू जर कोणती असेल तर ती गुळवेल आहे. हि वनस्पती शरीरातील विषजन्य पदार्थांपासून मुक्त होण्यास मदत करते आणि आपले मन शांत करते. तणाव ही एक समस्या आहे जी सहसा प्रौढ व्यक्तीमध्ये खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे पाहिली जाते. गुळवेलचे सेवन करून आपण आपला तणाव कमी करू शकता आणि शरीराची मानसिक आणि शाररिक देखभाल करू शकता आणि चांगले आरोग्य मिळवू शकता.

संधिवात

गुळवेलीमध्ये आर्थराइटिसविरोधी म्हणजेच संधिवातविरोधी गुणधर्म आहेत जे संधिवातवर उपचार करण्यास मदत करतात आणि त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. सांध्यावर सूज येणे हे संधिवाताचे लक्षण आहे. संधिवात असलेल्या लोकांमध्ये जी मुख्य लक्षणे दिसतात ती म्हणजे स्नायु आणि संधींमधे ताठरपणा असतो आणि वाढत्या वयानुसार ती अधिकाधिक खराब होते. गुळवेलीच्या सहाय्याने आपण आपली स्थिती सुधारू शकता.

मधुमेह

गुळवेल आपल्या शरीरात इन्सुलिन उत्पादनाचे स्तर व्यवस्थापित करण्यास मदत करते. गुळवेल जास्त प्रमाणात ग्लूकोज देखील ज्वलन करू शकतो आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतो. मधुमेह अशी स्थिती आहे जी आपल्या शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी करते आणि सामान्यत: मध्यम वयाच्या ते वृद्धांपर्यंत सगळ्या लोकांमध्ये हा आजार आढळतो. गुळवेलीमध्ये औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरात इन्सुलिन तयार करू शकतात ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.

श्वसन समस्या

गुळवेल सर्दी, खोकला अश्या श्वासोच्छवासाच्या समस्या कमी करण्यास मदत करते कारण त्याच्या दाहकता-विरोधी फायद्यांमुळे. गुळवेल तिच्या औषधी गुणधर्मांसह श्वसनविषयक समस्या कमी करण्यास मदत करते. आयुर्वेदीक औषधात मुबलक प्रमाणात ह्याचा वापर करून श्वसन संबंधी आजाराची औषध बनवली जातात. गुळवेल औषधी वनस्पती आजकाल सर्वाधिक वापरली जाणारी एक औषधी वनस्पती आहे आणि श्वसनविषयक समस्यांसाठी ती फायदेशीर ठरू शकते.

पचन सुधारते

अपचन हि हल्लीच्या काळातील एक सामान्य समस्या जी अनियमित खाण्याच्या सवयीमुळे किंवा इतर जीवनशैलीच्या समस्यांमुळे सहज पाहायला मिळत. गुळवेल जादूने तुमची पचन स्थिती सुधारण्यास मदत करते. आपल्यापैकी बहुतेकजण आपल्या जीवनशैलीच्या समस्यांमुळे बद्धकोष्ठता आणि अपचन ग्रस्त आहोत परंतु आपण या समस्यांसाठी गुळवेलीसारख्या औषधी वनस्पतींवर नेहमीच विश्वास ठेवू शकता. असे दिसून येते की बर्‍याच आयुर्वेदिक पचन औषधांमध्ये गुळवेल आढळू शकते.

तीव्र ताप

या औषधी वनस्पतीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्यामुळे, कधीकधी औषधी वनस्पती शरीरातील ताप म्हणजेच ज्वर कमी करण्यासाठी दिली जाते. फ्लू, विषाणूजन्य ताप इत्यादी हल्लीच्या काळात सामान्य गोष्टी आहेत, तापाची स्थिती सुधारण्यासाठी इतर औषध घेणे महत्वाचे आहेच परंतु शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम गुळवेल करते ज्यामुळे तुमचे शरीर तापाचा सामना करायला सिद्ध होते.

गुळवेल वापरताना घ्यायची काळजी

गुळवेल गर्भवती किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांनी घेऊ नये. गुळवेल एक फायदेशीर औषध आहे आणि आपल्याला बर्‍याच प्रकारे मदत करू शकते परंतु कोणताही आजार झाल्यास किंवा रोगाची बाधा झाल्यास डॉक्टरचा सल्ला घेवूनच गुळवेलीचा वापर करावा.

Photo of सर्व काही मराठी

सर्व काही मराठी

सर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप. हे संकेतस्थळ पूर्णतः मराठी च्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहील.

Related Articles

Back to top button