
महाराष्ट्रातील अष्टविनायकात मोरगाव हे प्रमुख व गाणपत्यसंप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. यालाच ‘भूस्वानंदभुवन’ असे म्हणतात.
मोरगाव हे क्षेत्र पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात कन्हा नदीच्या काठावर आहे. पुणे ते मोरगाव अंतर ६४ कि. मी. आहे.
- पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावरून एस. टी. गोड्या सुटतात,
- जेजुरी रेल्वे स्टेशनवर उतरूनही मोरगावला एस. टी. ने जाता येते. जेजुरी ते मोरगाव अंतर १८ कि. मी. आहे.
- दक्षिण रेल्वेच्या नीरा स्टेशनवर मोरगावला एस. टी. ने जाता येते.
- पुणे दौंड मार्गावरील केडगाव स्टेशनवरून मोरगावला एस. टी. ने जाता येते.
- पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासून ५५ कि. मी. चौफुला गाव आहे. तेथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर २३ कि. मी. आहे.
गाभान्यातील मयुरेश्वराची मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. मूर्ती बैठी व डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसविले आहेत, मस्तकावर नागराजाची फणा आहे. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस सिद्धिबुद्धिच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहे.
गणपतीसमोर आपल्या पुढच्या दोन पायात लाडू घेऊन उभा असलेला एक भला मोठा दगडी उंदीर आहे. तसेच एका चौथऱ्यावर मोठा नंदी आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी व माघ शुद्ध चतुर्थी (गणेशजयंती) असे दोन मोठे उत्सव होतात. मोरया गोसावी दर शुद्ध चतुर्थीला मोरगावला यात्रेला जात असत, आजही माघ शुद्ध चतुर्थी व भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी चिंचवडहून मोरगावला देवाची पालखी जाते.