तुळशी विवाह कथा – तुळशी कोण होती? – देव-उत्थानी एकादशी – Tulsi Vivha Story in Marathi
तुळशी विवाह कथा – तुळशी कोण होती? – देव-उत्थानी एकादशी – Tulsi Vivha Story in Marathi
तुळशी (वनस्पती) पूर्वजन्मी एक मुलगी होती, तिचे नाव होते वृंदा, ती राक्षसाच्या कुळात जन्मलेली होती, ती लहानपणापासूनच भगवान विष्णूची भक्त होती. ती मोठ्या प्रेमाने भगवान विष्णूची पूजा करीत असे. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तीच लग्न राक्षस कुळातील एक राजा जालंधर या राक्षसाशी झाले. जालंधरची उत्पत्ती समुद्रातून झाली होती.
वृंदा एक अतिशय समर्पित स्त्री होती, ती नेहमीच आपल्या पतीची सेवा करत असे. एकदा देव-दानव यांच्यात युद्ध झाले, जेव्हा जालंधर युद्ध करायला जाताना त्याला वृंदा म्हणाली…
स्वामी, जो पर्यंत तुम्ही युद्धावर असाल मी तुमच्या विजयासाठी उपासना करिन आणि तुम्ही पर्यंत येईपर्यंत हा संकल्प मी सोडणार नाही असे वचन मी तुम्हाला देते. त्यानंतर असुरराज जालंधर युद्धात गेले आणि वृंदा व्रताचा संकल्प सोडून उपासनेला बसली, व्रताच्या परिणामामुळे देवतांना जालंधरवर विजय मिळवला आला नाही, जालंधर विजयी होईल ह्या भीतीने सर्व देवता श्रीविष्णूंकडे गेले.
जेव्हा प्रत्येकाने भगवंताला प्रार्थना केली तेव्हा श्रीविष्णू असे म्हणाला की – वृंदा हि माझी परम भक्त आहे, मी तिच्याबरोबर फसवणूक करू शकत नाही.
मग देव म्हणाले – आम्हाला तुमच्या शिवाय कोण मदत करणार महाविष्णू आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत, तुम्हीच या संकटातून आम्हाला वाचावा.
तेव्हा भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले आणि वृंदाच्या राजवाड्यात पोचले. वृंदाने आपला नवरा पाहताच आपली उपासना थांबवली. ती ताबडतोब पूजेवरुन उठली आणि त्याच्या पायाला स्पर्श केला, जसा वृंदाचा संकल्प सुटला देवतांनी जालंधरला ठार मारले आणि जालंधर चे कापलेले डोके राजवाड्यात येऊन पडले. जेव्हा वृंदाने पाहिले की माझ्या नवऱ्याचे डोके कापले गेले आहे, तर मग समोर उभे असलेला हा कोण आहे?
तिने विचारले – तू कोण आहेस ज्याला मी स्पर्श केला, मग श्रीविष्णू त्यांच्या मूळरूपात आले परंतु काही बोलू शकले नाहीत, वृंदाला सर्व काही समजले, तिने श्रीविष्णूना शाप दिला आणि पाहताक्षणी श्रीविष्णूंचे पाषाणात रूपान्तर झाले.
सर्व देवता रडू लागल्या आणि लक्ष्मी रडून प्रार्थना करू लागली, ते पाहून वृंदा ने श्रीविष्णूंना शापातून मुक्त करून आपल्या पती सोबत सती गेली.
काही दिवसांनी जेव्हा तिच्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली तेव्हा भगवान विष्णू म्हणाले – आज पासून ह्या वनस्पतीचे नाव तुळशी असून, माझ्या पाषाणरुपी स्वरूपाचे म्हणजेच शाळीग्राम चे तुळशीसह पूजन केला जावे तुळशीशिवाय केलेली पूजा माझ्याकडून स्वीकरली जाणार नाही.
तेव्हापासून सर्वजण तुळशीची पूजा करू लागले. आणि कार्तिक महिन्यात तुळशीचे शाळीग्राम म्हणजेच श्रीविष्णूच्या पाषाण स्वरूपाशी लग्न लावायची प्रथा पडली. देव-उत्थानी एकादशीच्या दिवशी हा तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो.