जीवनशैली

मानसिक शांतता मिळविण्यासाठी साधे-सोपे उपाय

Simple Solutions to Achieve Peace of Mind – केवळ भौतिक सुखांच्या उपलब्धतेमुळे मनाला शांतता लाभत नाही

जीवनात भौतिक सुखांचा आनंद घेण्यासाठी मानसिक शांतता आवश्यक असते. केवळ सगळी सुखे असणे म्हणजे शांतता लाभणे नाही. पूर्वीच्या तुलनेत आजचा काळ जास्त धावपळीचा आणि त्यामुळे ताणतणावांचा आहे. जगावयाचे असल्यामुळे धावपळीला पर्याय नसला, तरी शांतताही तेवढीच आवश्यक असल्याचे विसरून चालणार नाही. ती कशी मिळवावी याबाबत एक्हार्ट टल्ल हे नव्या पिढीतील विचारवंत काय म्हणतात ते बघा.

निसर्गाकडे पाहा, झाडे आणि फुलांकडून शांतता शिकण्याचा प्रयत्न करा :

बाह्य जगात सुरू असलेल्या गडबड गोंधळासारखीच स्थिती आपल्या अंतर्मनातील विचारांमुळे निर्माण होत असते. बाह्य जगात शांतता असल्यावर जसे बरे वाटते, तसेच अंतर्मनातील कलह थांबल्यावर वाटते. निसर्गात असलेल्या शांततेकडे लक्ष दिलेत, तर तुम्हालाही ती अनुभविता येईल. बाहेर आज काल शांतता लाभणे कठीणच असले, तरी जी काही थोडी शांतता असते तिचा अनुभव घ्या. त्यामुळे तुमच्या अंतर्मनालाही शांती लाभेल. ही शांतता अनुभवित असताना मनात कोणतेही विचार न येऊ देण्याचा प्रयत्न करा. आसपासची झाडे, फुलांकडे पाहिलेत, तर ती किती शांत असतात हे तुम्हाला कळेल. त्यांच्याकडून आपण असे शांत राहण्यास शिकू शकतो…

वर्तमान क्षणाबरोबर मैत्री करा, कोणाबाबत कसलाही निष्कर्ष काढू नका:

या क्षणाबरोबर मैत्री केलीत, तर तुम्हाला प्रत्येक क्षण समाधानाचा वाटायला लागतो. कारण, हाच क्षण खरा असतो. वर्तमान क्षणच जीवनाचा खरा प्रतिनिधी मानला जातो.. तुमच्या जीवनात कितीही बदल झाले, तरी ‘आज’ चिरंतन राहत असल्याने त्याचे स्वागत करा, मैत्री करा. वर्तमान क्षणाबरोबर मैत्री केलीत, तर तुम्हाला कोठेही गेल्यावर घरीच असल्यासारखे वाटते. पण, मैत्री नसेल, तर कोठेही गेलात, तरी तुम्ही अस्वस्थ आणि चिंताग्रस्त राहता. आलेला क्षण आहे तसा स्वीकारलात तर तुम्हाला शांतता लाभेल. ते स्वीकरणे म्हणजेच जीवनाचा ताळमेळ निश्चित करणे. जीवन आहे तसे स्वीकारण्यामुळे तुम्ही बदलत जाता.

निष्कर्ष काढू नका :

एखाद्या व्यक्तीबाबत आपण फार घाईने काही निष्कर्ष काढतो किंवा मत तयार करतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि तिची विचार करण्याची, वागण्याची पद्धत भिन्न असते हे आपण विसरणे हे त्याचे कारण, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातून काहीही निष्कर्ष न काढणे योग्य, तुम्ही फक्त सौहार्दाचे संबंध जोपासलेत, तर तुम्हाला शांतता मिळते.

Photo of सर्व काही मराठी

सर्व काही मराठी

सर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप. हे संकेतस्थळ पूर्णतः मराठी च्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहील.

Related Articles

Back to top button