Magnetar

मॅग्नेटर (Magnetar) हा एक अत्यंत शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र असलेला न्युट्रॉन स्टारचा एक प्रकार आहे. इतर न्युट्रॉन तारे प्रमाणे, मॅग्नेटर हे तारे साधारण २० किलोमीटर (१२ मैल) व्यासाचे असतात आणि त्यांचे वासुमान सूर्यच्या वस्तुमानाच्या २-३ पट असते (उदाहरण द्यायचे झाल्यास सूर्याचे वजन जर १ किलो असेल तर मॅग्नेटर ताऱ्याचे वजन २-३ किलो भरेल). ह्या ताऱ्याची घनता इतकी भयंकर आहे कि ह्या ताऱ्याच्या एक चमचाभर भागाचे वजन तब्बल ९०,७१,८४,७४,००० किलो भरेल.

मॅग्नेटर ताऱ्याचे भयंकर शक्तिशाली चुंबकीयक्षेत्र आणि त्याची फिरण्याची गती (परिभ्रमण) हे त्याला न्युट्रॉन ताऱ्यापेक्षा वेगळी ओळख मिळवून देतात. जिथे न्युट्रॉन ताऱ्याचे परिभ्रमण हे १ ते १० सेकंदात होते तिथे मॅग्नेटर तारा १ सेकंद वेळ घेतो.

मॅग्नेटर ताऱ्याचे आयुष्यमान इतर ताऱ्यांच्या तुलनेत कमी असते. १०,००० वर्षानंतर ह्या महाभयंकर चुंबकीय क्षेत्राचा ऱ्हास व्हायला सुरु होते. आजपर्यंत माहित असलेल्या मॅग्नेटर्सची संख्या लक्षात घेता, अंदाजे 30 लाख किंवा त्याहून अधिक मॅग्नेटर आपल्या आकाशगंगेमध्ये (Milky Way) आहेत.

मॅग्नेटर ताऱ्याचे पृथ्वीच्या ६००० प्रकाशवर्षे जवळ येणे विध्वंस घडवेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here