Sunil Barve Marathi Hero

जाणून घ्या मराठी नायक सुनील बर्वे विषयी

जाणून घ्या मराठी नायक सुनील बर्वे विषयी

जन्म दिनांक : 3 ऑक्टो. १९६६

एज्युकेशन: बीएस्सी. रसायनशास्त्र … पाटकर महाविद्यालय

आवडता रंग: निळा

आवडतं खाद्य: शाकाहारी मध्ये काहीही

आवडतं आवडता हॉटेल: सुमेर कापणी

आवडती सुट्टीची ठिकाणे: गोवा

आवडता अभिनेता: बलराज साहनी, अमिताभ बच्चन

आवडती अभिनेत्री: रेखा, नूतन

आवडता दिग्दर्शक: विजय आनंद

आवडता गायक (पुरुष): किशोर कुमार, येसूदास, भूपिंदर सिंग

आवडता गायक (स्त्री): आशा भोसले, उषा उथुप

ओळख

सुनील बर्वे  हे मराठी-हिंदी-गुजराती नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्येही ते काम करतात. त्यांनी मुंबईतल्या पाटकर कॉलेजातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्‌सी. केलं आहे. त्यांनी यूएस व्हिटॅमिन्स या कंपनीत फक्त एक महिना नोकरी केली, पण तिथे त्यांचे मन रमले नाही. आधीपासूनच ते तबल्याच्या आणि गाण्याच्या क्लासला जात असत. ते सात वर्षे तबला शिकले. गांधर्व महाविद्यालयाची मध्यमा ही संगीताची परीक्षा ते उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व करतानाच त्यांचा संबंध थिएटर ग्रुपशी झाला. त्यातूनच त्यांचा विनय आपटे यांच्या अफलातून या संगीत नाटकात शिरकाव झाला (१९८५). त्यांना एका गाणार्‍या पात्राची भूमिका मिळाली होती. ती भूमिका यशस्वी झाल्यावर सुनील बर्वे यांना ’मोरूची मावशी’ आणि कशी मी राहू तशीच’ यांसारख्या मराठी नाटकांत काम करायले मिळाले,. आणि अभिनयक्षेत्रात उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होत गेली. सुनील बर्वे यांची ‘सुबक’ नावाची नाट्यसंस्था आहे.

सुनील बर्वे अभिनीत मराठी चित्रपट

 • आई
 • आत्मविश्वास
 • आनंदाचे झाड
 • आहुती
 • गोजिरी
 • जमलं हो जमलं
 • तू तिथं मी
 • दिवसेंदिवस
 • लपंडाव
 • लालबागचा राजा
 • सुगंधा

 सुनील बर्वे अभिनीत हिंदी चित्रपट

 • अस्तित्व
 • टुन्नू की टिना
 • निदान

 सुनील बर्वे अभिनीत मराठी नाटके

 • अफलातून
 • असेच आम्ही सारे
 • आपण ह्यांना ऐकलंत का
 • ऑल दि बेस्ट
 • इथे हवंय कुणाला प्रेम
 • कशी मी राहू तशीच
 • चारचौघी
 • झोपी गेलेला जागा झाला (फार्स)
 • बायकोच्या नकळत
 • मोरूची मावशी
 • म्हणून मी तुला कुठेच नेत नाही
 • लग्नाची बेडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here