आरोग्य

अशी ठेवा आपली मूत्रपिंड निरोगी – Kidney Health Tips in Marathi

अशी ठेवा आपली मूत्रपिंड निरोगी – Kidney Health Tips in Marathi

मूत्रपिंड आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी आवश्यक भूमिका बजावत असतात, म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. खालील पाच सोपे उपाय आपण आपल्या जीवनशैलीमधे अंतर्भूत केल्याने आपले मूत्रपिंड चांगल्या स्थितीत राहण्यास मदत होते.

सजलीत (हायड्रेटेड) रहा

भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे आपल्या मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थितपणे चालू राहण्यास मदत होते. तुमची लघवी पारदर्शक रंगाची असावी. जर ती जास्त गडद असेल तर ते डिहायड्रेशनचे लक्षण असू शकते.

गरम हवामानादरम्यान, गरम देशांमध्ये प्रवास करताना किंवा अधिक व्यायाम करताना, घामामुळे कमी झालेल्या द्रवपदार्थांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला नेहमीपेक्षा जास्त पाणी पिण्याची गरज आहे जेणेकरून तुमचे मूत्रपिंड सुरळीत कार्य करत राहील.

आरोग्यदायक गोष्टी खा

संतुलित आहार आपल्याला आपल्या शरीरास आवश्यक असणारी सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळण्याची हमी देतो. भरपूर फळ, भाज्या, धान्य, गव्हापासून बनलेला पास्ता, ब्रेड खा. जास्त खारट किंवा स्निग्ध आहार घेऊ नका.

आपला रक्तदाब पहा

आपल्या ब्लड प्रेशरची म्हणजेच रक्त्तदाबाची नियमित तपासणी करा. उच्च रक्तदाबात कोणतीही लक्षणे नसतात, परंतु यामुळे मूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्येचा धोका वाढू शकतो. आदर्श रक्तदाब ९०/६० mmHg आणि १२०/८० mmHg दरम्यान मानला जातो.

धूम्रपान करू नका किंवा जास्त मद्यपान करू नका

धूम्रपान पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करा आणि मद्यपानसुद्धा कमी प्रमाणात करा, न केल्यास उत्तमच आहे. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही आठवड्यात १४-युनिटपेक्षा जास्त मद्यपान न करण्याचा सल्ला दिला जातो.

जास्त प्रमाणात मद्यपान करणे आणि धूम्रपान करणे यामुळे तुमचे रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाब हे मूत्रपिंडाच्या आजाराचे सर्वात सामान्य कारण आहे.

शरीर आणि वजन ह्याचा समतोल साधा

जास्त वजन वाढल्याने तुमचा रक्तदाब वाढतो, जे तुमच्या मूत्रपिंडासाठी वाईट आहे. स्वतःचे शरीर आणि वजन ह्याचा समतोल राखा.

आपले शरीर द्रव्यमान (बॉडी मास इंडेक्स – बीएमआय) हे आपले वजन बरोबर आहे की नाही हे तपासण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

दर आठवड्याला चालणे, सायकल चालविणे किंवा पोहणे यासारख्या मध्यम-तीव्रतेच्या व्यायामाचा तुमच्या जीवनशैलीत समावेश करा. संपूर्ण आठवड्यात किमान १५०-मिनिटे मध्यम-तीव्रतेचा व्यायाम करा.

Photo of सर्व काही मराठी

सर्व काही मराठी

सर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप. हे संकेतस्थळ पूर्णतः मराठी च्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहील.

Related Articles

Back to top button