विज्ञान

जाणून घ्या मुंग्या त्यांचे घर कसं शोधतात?

मुंग्या दिशा-निर्देश करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात जो मुंग्यांच्या प्रकारावर आणि आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. सर्वसाधारणपणे, मुंग्या स्वतःच्या दृष्टीने, खुणा, सूर्यप्रकाश उपयोग करून घर शोधतात, अगदी तसेच जसे मनुष्यप्राणी कोणत्याही यंत्र, जीपीएस वा नकाशाच्या साहाय्याशिवाय करतो काही वैज्ञानिकांच्या नुसार काही कितात हे आकाशातील ताऱ्यांच्या आधारे मार्ग शोधात मात्र मुंग्या तसं करू शकत नाहीत.

मुंग्यांना नकाशाची गरज नाही

हरवण्याची भीती मुंग्यांना नसते कारण त्यांच्या डोळ्यांच्या बहुआयामी रचनेमुळे त्यांना आजूबाजूचा प्रदेश ओळखीचा झालेला असतो. जेव्हा नवीन घर तयार करण्याची वेळ येते तेव्हा पंख असलेले नर आणि मादी मुंग्या जवळच्या प्रदेशात उडतात आणि फेरोमोनद्वारे एकमेकांना शोधतात. फेरोमोन हे एक रासायनिक निर्देशक आहे जे मुंग्यांमध्ये माहिती पोचवण्याचं काम करते. नर मुंग्यांना मादीकडे आकर्षित करण्यातही फेरोमोन चा उपयोग होतो.

शारीरिक गंध

लीफ-कटर ह्या प्रकारातल्या मुंग्या त्यांच्या मार्गात एक प्रकारचा गंध सोडतात. अनेक प्रजाती प्रमाणे ह्या मुंग्या देखील बराच प्रवास करतात त्या मुख्यतः पाने शोधण्यासाठी घरापासून लांब प्रवास करतात. ह्या पानांची घरात साठवणूक करून त्यावर येणारी बुरशी खाऊन त्या जगतात. त्यामुळे अधिक लांबचा प्रवास नचुकता करण्यासाठी त्या रस्ताभर एक गंध सोडतात जो त्यांना पुन्हा घरी येताना मार्गदर्शक ठरतो.

सूर्य प्रकाश

सहारा वाळवंटातील मुंग्या ह्या आपले मार्गक्रमण करतांना सूर्याची हालचाल लक्षात ठेवतात. त्यांच्यात अंतर निश्चित करण्याची क्षमता देखील आहे. मात्र काही शोधकर्त्यानी असं शोधलं कि जास्त अंतर पार केल्यावर अनेक मुंग्या मार्ग विसरतातही.

कौशल्य आणि सवय

मुंग्यांमध्ये कामाचं कौशल्य खूपच आहे त्या सतत काहीनाकाही शोधून आपल्या घराकडे नेण्याच्या प्रयत्नात असतात, मुंग्यांना आपल्या वजनापेक्षा जास्त वजन वाहून नेताना आपण अनेक वेळा पाहिलं असेल, त्यांच्या रोजच्या प्रवासाच्या सवयीने त्यांना अनेक रस्ते पाठ झालेले असतात.

अश्या प्रकारे मुंग्या आपला येण्या जाण्याचा मार्ग शोधतात मात्र अजूनही आपण मुंग्यांच्या बाबतीत अनेक गोष्टीपासुन अजाणतेच आहोत.

Photo of सर्व काही मराठी

सर्व काही मराठी

सर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप. हे संकेतस्थळ पूर्णतः मराठी च्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहील.
Back to top button