सामान्य ज्ञान

वास्तुशास्त्रानुसार घरात घोड्याचे चित्र का आणि कोठे लावावे?

वास्तुशास्त्रानुसार घरात घोड्याचे चित्र का आणि कोठे लावावे?

तुमच्या वास्तुनुसार धावणाऱ्या घोड्याचे चित्र दक्षिणेकडील दिशेला लावावा जेणेकरून घोड्याचे तोंड घराच्या आत किंवा कार्यालयाच्या आतील बाजूस येते.

घोड्याचे चित्र लावण्या चे फायदे

वास्तुशास्त्रानुसार घोडा हे प्रगतीचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळे घरातील घोड्याचे चित्र जर नेहमी तुमच्या दृष्टीस पडले तर मानसिक रित्या तुमची कार्यशैली वाढण्यास मदत होते.

पांढऱ्या रंगाचा घोडा हा वास्तुशास्त्रानुसार उर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो, म्हणून घरी किंवा ऑफिसमध्ये पांढर्‍या घोडाचे चित्र लावा.

 

संगणकाच्या वॉलपेपरवर घोड्याचे चित्र ठेवा, त्याचा तुमच्या कार्यावर परिणाम होईल आणि तुमची मानसिक ऊर्जा वाढेल.

जर आपण कर्जामुळे त्रस्त असाल तर मग घर किंवा ऑफिसमध्ये एक मूर्तिस्वरूप किंवा शोपीस घोडा वायव्य दिशेला ठेवा, जो बाजारात सहज सापडेल. यामुळे आपल्याला प्रगतीच्या संधी मिळून लवकरच कर्जापासून मुक्तता मिळेल आणि नोकरी-व्यवसाय यामध्ये यश वाढेल.

या प्रकारच्या घोडाची छायाचित्रे घरी किंवा ऑफिसवर ठेवा

धावणाऱ्या घोड्याचे चित्र

घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये धावणाऱ्या घोड्याचे चित्र लावण्याने आपले कार्य वाढते आणि आपल्याला ऊर्जावान आणि स्फूर्ती भरल्याचे वाटते.

सात घोड्यांचे चित्र

घरात किंवा कार्यालयात पांढर्‍या सात घोड्यांचे चित्र लावा, कारण इंद्रधनुष्याचे रंग, लग्नातील फेरे असे अनेक विधी आहेत ज्यात ७ अंक महत्वाचा आहे.
शास्त्रानुसार ७ अंक खूप महत्वाचे असल्याने ७ घोड्यांचे चित्र लावा. लक्षात ठेवा चित्रात ७ पेक्षा कमी घोडे नसावेत. हे चित्र लावल्यास तुमच्या आयुष्यात कोणताही उतार-चढ़ाव येणार नाही आणि महालक्ष्मी ची कृपा सदैव राहणार आहे.

वास्तुशास्त्रानुसार आपण घोड्यांचे चित्र का ठेवले पाहिजे

  • प्रगती करण्यासाठी
    जीवनात यश मिळविण्यासाठी
    वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी
    कर्जमुक्तीसाठी
    उत्साही राहण्यासाठी
    सकारात्मक ऊर्जेसाठी
    पैसे मिळविण्यासाठी

घोड्याचे चित्र लावण्या आधी खालील गोष्टींची दक्षता घ्यावी

  • चित्र कोणत्याही बाजूने कापून लावू नये.
  • चित्र अस्पष्ट असू नये.
  • चित्रातील घोड्यांची संख्या 7 असणे आवश्यक आहे, कमी किंवा जास्त नाही.
  • छायाचित्र काढताना, घोड्याचा चेहरा आनंदी स्थितीत असल्याची खात्री करा.
  • घोड्यांच्या चित्रात घोडे वेगवेगळ्या दिशेने नसून एका दिशेने दिसावेत.

 

सर्व काही मराठी

सर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप. हे संकेतस्थळ पूर्णतः मराठी च्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहील.

Related Articles

Back to top button