summer-skin-care-tip-in-marathi

मित्रांनो उन्हाळा जवळ आला आहे, आणि ज्या प्रकारे उष्मा वाढत आहे आपल्या त्वचेची, चेहऱ्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात खालील ६ गोष्टीं नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत.

१. आपला चेहरा धुवा

दिवसातून किमान ४ वेळा सौम्य  क्लीन्झेर ने चेहरा धुवा. क्रीम आधारित  क्लीन्झेर शक्यतो टाळा  (जर तुमची त्वचा कोरडी नसेल) कारण त्याने तुमची  त्वचा तेलकट होऊ शकते. मृत त्वचा पेशींपासून मुक्त होण्यासाठी दर आठवड्याला किमान दोन वेळा जेलचा वापर करा.

washing face marathi

२. केसांना तेल लावा

आठवड्यातून किमान दोन वेळा केसाला तेल लावा. साधारण केस धुण्याच्या एक तास आधी केसांना तेल लावा. केस धुवून झाल्यावर एखादे कंडीशनर लावू शकता.

oiling hair marathi

३. चेहऱ्याला लेप लावा

उन्हाळ्यातच नव्हे तर संपूर्ण वर्षभर शक्यतो घरगुती लेप (फेसपॅक) लावा, कारण ते उत्तम आणि सुरक्षित असतात. दही, चंदन चूर्ण, टोमॅटो रस आणि कोरफड जेलचा वापर करा. हे मिश्रण केवळ त्वचा स्वच्छ करणार नाही तर आपल्या चेहऱ्यावर एक चमक निर्माण करेल.

या उन्हाळ्यात आपल्या त्वचेसाठी घरगुती ब्लीच करून पहा – दही व बेसन यांचे मिश्रण करून त्यात अर्धा लिंबाचा रस घालून ते चिकट होईपर्यंत मिसळा. 15 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर व मानेवर लावा आणि थंड पाण्याने धुवा. त्वचा स्वच्छ आणि चमकणारा होईल.

facepack marathi

४. बाहेर जाताना घ्यायची काळजी

 

आपण घराबाहेर जाताना सनस्क्रीन लावून घराबाहेर पडा आणि जास्त वेळ बाहेर राहणार असल्यास दर चार तासात एकदा सनस्क्रीन लावा. आपण बाहेर जाताना अतिरिक्त तेल काढलेला ब्लॉटिंग पेपर घ्या, सनस्क्रीन लोशन, ओले विप्स, ओठाचे मलम (लीप बाम) सोबत घ्या

 ५. नैसर्गिक आहार घ्या

भरपूर पाणी, ताजे रस वापरा आणि भाजीपाला सॅलड्स आणि फळांच्या सॅलड्सचा वापर करा. ताजी फळे, रस आणि भाज्या आपल्या शरीरातील विषारी द्रव्य कमी करतील व शरीर स्वच्छ होईल. उन्हाळ्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळणे चांगले आहे कारण ते आपल्या त्वचेवर तेल साठवतात. fruit dish marathi

 ६. आपले डोळे आणि केसांचे संरक्षण करा

आपण वारंवार बाहेर पडत असाल तर आपले केस, चेहरा आणि डोळे यांचे संरक्षण करण्यासाठी स्कार्फ, टोपी, गोगल यांचा वापर करा. शक्यतो केस मोकळे सोडू नका, वा जमल्यास केस कमी ठेवणे उत्तम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here