जीवनशैली

७ सवयी ज्या तुमची उत्पादन क्षमता नष्ट करतात आणि त्यावरील उपाय!

उत्पादन क्षमता वाढवण्याच्या युक्त्या – Productivity Improvement Techniques Marathi

 

१. सकाळी उठल्या नंतरचा योग्य दिनक्रम नसणे.

सकाळी लवकर न उठणे आणि आपला संपूर्ण दिनक्रम न ठरवणे आपल्या उत्पादन क्षमतेवर नक्कीच नकारात्मक परिणाम पाडू शकते.

त्यापेक्षा तुम्ही हे करू शकता:

तुमच्या दिवसावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला लवकर उठावच लागेल त्यामुळे तुम्ही दिवसभरात करणाऱ्या गोष्टीना कश्या रीतीने चांगल्या प्रकरे करू शकता ह्याचा आराखडा बनवू शकता.

  • सकाळी उठल्यावर १ पेला पाणी प्या.
  • आवडी नुसार चहा/कॉफी प्या (साखर नाही). नाही प्यायला तरी उत्तमच आहे.
  • ५ मिनिटे: हलका व्यायाम (म्हणजे सूर्यनमस्कार/आसने).
  • १० मिनिटे: तुमच्या संपूर्ण दिवसाची योजना करा.
  • २० मिनिटे: लिहा/वाचा.
  • ५ मिनिटे: प्रार्थना/ध्यान.

 

२. वेड्या सारखं गंमत म्हणून समाज माध्यम पाहत वेळ घालविणे

बिनदिक्कतपणे विचार न करता वेड्या सारखं गंमत म्हणून समाज माध्यम (सोशल मीडिया) पाहत वेळ घालविणे किंवा तुमचा ईमेल तपासणे हा एक मोठा सापळा आहे. लोकांकडून वर्षातून शेकडो तास असेच वाया जातात आणि तुमची उत्पादकता कमी होते.

त्यापेक्षा तुम्ही हे करू शकता:

खालील उपाय वा सवयी अंगीकारून तुम्ही या वेळ चोरीच्या सापळयात अडकण्या पासून स्वतःला दूर ठेवू शकता.

  • तुम्ही एखाद महत्वाचं काम करत असताना आपला भ्रमणध्वनी आपल्या पासून लांब ठेवा.
  • कोणतेही बिना कामाचे मूल्य नसलेले आणि तुमचा वेळ खाणारे ऍप तुमच्या भ्रमणध्वनी मधून काढून टाका.
  • जर/तर ची सवय लावा: जर तुम्ही तुमचे काम करत असाल तर तुम्ही नेट ब्राउझ करू शकता.

 

३. एकावेळी एकापेक्षा जास्त कामे करण्याची कला

एकाच वेळी अनेक कार्ये करण्याचा प्रयत्न करणे चांगली कल्पना वाटू शकते, परंतु असंख्य अभ्यासकांनी बहुकार्य करण्याची सवय उत्पादकतेसाठी नकारात्मक असल्याचे दर्शविले आहे. करत असलेले कार्ये बदलल्याने उत्पादकता ४०% कमी होऊ शकते असे अभ्यासक म्हणतात.

त्यापेक्षा तुम्ही हे करू शकता:

  • सर्वात महत्त्वाच्या कार्याची यादी तयार करा आणि प्राधान्य द्या.
  • पोमोडोरो तंत्र वापरून पहा: ५-मिनिटांच्या विश्रांतीसह २५ मिनिटे काम.
  • एखादे महत्वाचे काम करताना तुमच्या भ्रमणध्वनी वर डू-नॉट डिस्टर्ब फंक्शन वापरा.

 

४. प्रत्येक गोष्टीला “होय” म्हणणे

तुम्हाला केलेल्या प्रत्येक विनंतीला ‘हो’ म्हणणे उदात्त वाटते, परंतु कालांतराने तुमच्यावर ताण येईल आणि तुमच्या कामाची गुणवत्ता कमी होईल.

त्यापेक्षा तुम्ही हे करू शकता:

एखाद काम करत असताना नवीन कामाबद्दल विचारल्यावर, तुमच्याकडे ऊर्जा, वेळ आहे का आणि ते तुमच्या मूल्यांशी सुसंगत आहे की नाही हे स्वतःला विचारा.

  • उत्तर जर “होय” असेल, तर सहमत दाखवा.
  • “अनिश्चित” असल्यास, निर्णय घेण्यासाठी अधिक वेळ मागा.
  • जर “नाही”, तर मनापासून विनंती करा आणि नम्रपणे त्यांचे आभार माना, तरीही ठामपणे नकार द्या.

 

५. स्वयंचलित निर्णय क्षमतेची कमतरता

प्रत्येक सोप्या आणि सारख्या स्वरूपाच्या कामावर दैनंदिन निर्णय घेतल्याने इच्छाशक्ती कमी होते जी अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे आणि हे टाळता येऊ शकते.

चे लेखक जॉन टियरनी म्हणतात की याचा परिणाम “निर्णय घेताना थकवा” मध्ये होतो.

त्यापेक्षा तुम्ही हे करू शकता:

एक दिवस आधी किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही शक्य तितकी कार्ये स्वयंचलित करा उदाहरणार्थ,

  • आदल्या दिवशी तुमची जिम बॅग पॅक करा.
  • आदल्या दिवशी कामाचे कपडे निवडून, इस्त्री करून ठेवा.
  • पुनरावृत्ती प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी तंत्रज्ञान वापरा. जसे कि एखादी गोष्ट दिवसातून अनेक वेळा करायची असेल जसे दिवसातून ८ ग्लास पाणी प्यायचे असेल तर आपल्या भ्रमणध्वनी मध्ये रिमाइंडर लावून ठेवा म्हणजे इतर कामे करत असतात तुम्हाला रोजची कामे लक्षात ठेवावी नाही लागणार.

 

६. आराखड्या शिवाय काम करणे

जोपर्यंत तुम्ही तुमच्या मूल्यांसाठी आणि ध्येयांसाठी एक ठोस आराखडा तयार करत नाहीत, तोपर्यंत दररोज शेकडो निर्णय घेतल्याने तुम्हाला त्रास होणारच.

काही निर्णयांचे दोन पर्याय असतात, मात्र तुमच्यासाठी उत्तम काय आहे?

त्यापेक्षा तुम्ही हे करू शकता:

  • निर्णय वृक्ष स्वरूपाचा एक आराखडा तयार करा, त्यातील कोणते मुद्दे महत्वाचे आहेत ते पडताळा.
  • निर्णय वृक्ष हे एक आकृती आहे जे दर्शविते की एका निर्णयामुळे भिन्न परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते ज्यासाठी दुसरा निर्णय आवश्यक आहे.
  • निर्णय वृक्षाने निर्णय घेणे म्हणजे स्पष्टीकरण आणि भविष्यवाणी ची एक प्रक्रिया आहे, जी अमलात आणल्याने तुमची उत्पादकता वाढते. म्हणजे जसे महाराजांनी अफजल खानाच्या भेटीला नुसतं चिलखत घातलं नव्हतं तर वाघनख आणि इतर अनेक गोष्टी तयार ठेवल्या होत्या.

 

७. परिपूर्णतावाद

नेहमी कोणतीही गोष्ट करताना ती पूर्ण होण्याच्या आधीच परिपूर्ण आहे का ह्याचा सतत विचार करणे तुमची उत्पादन क्षमता कमी करते.

परिपूर्णता कधीही प्राप्त होणार नाही. आपण प्रामाणिक असल्‍यास मंजूर कराल कि, पुष्कळ वेळा विलंबाचे औचित्य सिद्ध करण्‍याचे हे एक साधन असते.

त्यापेक्षा तुम्ही हे करू शकता:

  • काळा-पांढरा विचार करणे थांबवा: जसे “पुर्णत्वापेक्षा कमी कोणतीही गोष्ट म्हणजे अपयश” सगळ्या गोष्टी परिपूर्ण नसतात काही ना काही कमी राहतच.
  • कहर करणे थांबवा: जसे “तुम्ही प्रत्येक चेंडूवर प्रत्येक वेळी षटकार नाही मारू शकणार”.
  • संभाव्यतेचा अवाजवी अंदाज टाळा: जसे “मला माहित आहे की जर मी एखादी गोष्ट परीपूर्ण केली नाही तर, तर संपूर्ण योजना कचऱ्याचा टोपलीत जाईल.”

थोडक्यात:

१. सकाळची दिनचर्या तयार करा
२. समाज माध्यमांचा अतिरेक टाळा
३. एका कामाला प्राधान्य द्या, एकाधिक कार्य करू नका
४. “नाही” म्हणायला शिका
५. दैनिक स्वयंचलित कार्यप्रणाली तयार करा
६. वैयक्तिक आराखडा तयार करा
७. परीपूर्णता अस्तित्वात नाही हे मान्य करा

सर्व काही मराठी

सर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप. हे संकेतस्थळ पूर्णतः मराठी च्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहील.

Related Articles

Back to top button