मराठी गाणी

गोव्याचे किनाऱ्यावर – Govyachya Kinaryavar Marathi Song Lyrics – शुभांगी केदार, रजनीश पटेल

गोव्याचे किनाऱ्यावर – Govyachya Kinaryavar Marathi Song Lyrics – शुभांगी केदार, रजनीश पटेल आणि प्रवीण कोळी

गायकशुभांगी केदार, रजनीश पटेल आणि प्रवीण कोळी
संगीतकारप्रवीण कोळी – योगिता कोळी
गीतकारकुमार सुरेश दिवेकर

हैय्या हो. . . .

रुपेरी वालू , सोनेरी लाटा
त्याव माझ व्हरक तरतय
कोने देशी नेऊ , कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय घरतय. . .

गोव्याचे किना-याव , नाखवा व्हरीन नेशील का ?
निले सागरी दुनियेची सफर देशील का ?

नको बघु अस , मनी होत कस
माझे कालजान भरली रं लाज
तुझे नजरच्या जाल्यामंदी
कालीज गुतल आज

गोव्याचे किना-याव , नाखवा व्हरीन नेशील का ?
गोव्याचे किना-याव , नाखवा बेगीन नेशील ना. . .

इच्छा तुझे मनी. . येवो माझे ध्यानी
न सांगता समजल का ?
त्या गोव्याचे बाजारानु
हात हाती देशील का?

एैशे गोवे शहरान जरी नेशील संगान
एक हाैस माझी पुरवाल का ?
माझे एकवीरा माऊलीच दर्शन घरवाल का ?

रुपेरी वालू , सोनेरी लाटा
त्याव माझ , व्हरक तरतय
कोने देशी नेशील , कोने गावी नेशील
सांग तुझे मनान काय चाल्लय. . .

कोने देशी नेऊ , कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय घरतय. . .

Photo of सर्व काही मराठी

सर्व काही मराठी

सर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप. हे संकेतस्थळ पूर्णतः मराठी च्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहील.

Related Articles

Back to top button