कोरोना व्हायरस (कोविड-१९) आढावा
कोरोना व्हायरस (कोविड-१९) हा संसर्गजन्य आजार पसरवणारा एक नवीन विषाणू आहे ज्याची यापूर्वी आपल्याला ओळख पटली नव्हती मात्र आता तो झपाट्याने वाढू लागला आहे. या विषाणूमुळे श्वासोच्छवासाचा आजार (फ्लूसारखा), खोकला, ताप आणि जास्त गंभीर प्रकरणांमध्ये तर न्यूमोनिया होतो.
या आजारापासून आपण स्वतःचे रक्षण करण्यासाठी वारंवार आपले हात स्वच्छ धुणे आणि हाथ न धुता चेहऱ्याला स्पर्श करणे टाळावे हे साधारण खबरदारीचे उपाय आहेत.
कोरोना व्हायरस (कोविड-१९) ह्या आजारात नाक वाहणे, घसा खवखवणे, खोकला आणि ताप हि सौम्य लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हा आजार काही लोकांसाठी अधिक गंभीर बाब बनू शकतो आणि यामुळे न्यूमोनिया किंवा श्वासोच्छवासाची समस्या उद्भवू शकते.
जरी हा आजार अगदी नवीन असला, संपूर्ण जगभर धडकी भरवणारा असला तरी क्वचितच, हा रोग जीवघेणा असू शकतो. वृद्ध लोक आणि इतर आजार जसे दमा, मधुमेह किंवा हृदय रोग असलेले लोक ह्या कोरोना व्हायरस (कोविड -१९) मुळे गंभीर आजारी पडण्याची अधिक शक्यता असते.
कोरोना व्हायरस (कोविड-१९) लक्षणे
कोरोना व्हायरस बाधित व्यक्तीची लक्षणं:
- नाक वाहणे
- घसा खवखवणे
- खोकला
- ताप
- श्वास घेण्यास त्रास (गंभीर प्रकरणात)
कोरोना व्हायरसचा (कोविड -१९) प्रतिबंध
कोरोना व्हायरस हा आजार रोखण्यासाठी सध्या कोणतीही लस नाही. मात्र ह्याचा संसर्ग होण्याचा धोका कमी करणं आपल्या हातात आहे.
- निर्जंतुकीकरण करणार द्रव्य (सॅनिटायझर) किंवा साबण वापरून हात वारंवार स्वच्छ धुणे.
- शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाकणे.
- सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे असलेल्या कोणाशीही जवळचा संपर्क (1 मीटर किंवा 3 फूट) टाळणे.
कोरोना व्हायरसचा (कोविड -१९) उपचार
कोरोनाव्हायरस आजार रोखण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी कोणतेही विशिष्ट औषध नाही. जर तुम्हाला वर दिलेली सौम्य लक्षणे आढळल्यास, शक्यतो बरे होईपर्यंत घरीच रहा.
वरील लक्षणांशी लढण्याकरिता:
- विश्रांती घ्या आणि झोपा
- उबदार वातावरणात रहा
- भरपूर द्रव पदार्थाचे सेवन करा
- खोलीतील ह्युमिडिफायरचा (एखाद्या खोलीतील किंवा इमारतीमधील दमटपणा वाढवणारे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणारे साधन) वापर करा किंवा घसा खवखवणे आणि खोकला कमी होण्यास गरम पाण्याची वाफ घ्या.
जर आपल्याला ताप आणि खोकला झाला असेल तर – आपण डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि बरे होईपर्यंत घरी रहा. हा आजार संसर्गजन्य असल्याने स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी कमीतकमी १४ दिवस गर्दी पासून दूर रहा.
Related posts
असा करा व्यक्तिमत्व विकास – Personality Development Tips in Marathi
व्यक्तिमत्व विकास कसा करावा – Personality Development Tips in Marathi तर, आता प्रश्न आहे की व्यक्तिमत्व कसे विकसित करावे? व्यक्तिमत्त्व…
तुळशीचा काढा जो रोग प्रतिकारशक्ती वाढवेल!
तुळशीचा काढा जो रोग प्रतिकारशक्ती वाढवेल! Ayurvedic Tulsi Kadha Recipe जर आपल्याला लहानपणापासूनच चांगला आहार देण्यात आला असेल तर रोग…
कोरोना व्हायरस (कोविड-१९) – Coronavirus Disease (COVID-19) in Marathi
कोरोना व्हायरस (कोविड-१९) आढावा कोरोना व्हायरस (कोविड-१९) हा संसर्गजन्य आजार पसरवणारा एक नवीन विषाणू आहे ज्याची यापूर्वी आपल्याला ओळख पटली…
ह्या उन्हाळ्यात ६ प्रकारे घ्या त्वचेची काळजी – 6 Summer Skin Care Tips in Marathi
ह्या उन्हाळ्यात ६ प्रकारे घ्या त्वचेची काळजी – 6 Summer Skin Care Tips in Marathi मित्रांनो उन्हाळा जवळ आला आहे,…
तुळशीचा काढा जो रोग प्रतिकारशक्ती वाढवेल!
तुळशीचा काढा जो रोग प्रतिकारशक्ती वाढवेल! Ayurvedic Tulsi Kadha Recipe जर आपल्याला लहानपणापासूनच चांगला आहार देण्यात आला असेल तर रोग…
झुणका पाककृती
झुणका पाककृती पारंपारिक महाराष्ट्रीयन आणि मसालेदार, झुणका हे लोकप्रिय पिठल्याचा कोरडा प्रकार आहे. हे आलं, हिरवी मिरची, लसूण, कांदे आणि…