प्रवासधर्म

श्री अष्टविनायक दर्शन यात्रा – श्री चिंतामणी (थेऊर)

श्री चिंतामणी हे विनायकस्थान पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात थेऊर या गावी आहे.

हे क्षेत्र अतिप्राचीन समजले जाते. थेऊरला जाण्यासाठी यात्रेकरूंनी पुण्याला प्रथम येणे हे चांगले तसेच मोरगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर व रांजणगाव हे अष्टविनायकातील पाच गणपती पुण्यापासून जवळ व सोयीस्कर आहेत.

  • थेऊर हे मुळा मुठेच्या काठावर पुण्यापासून अवघ्या २३ कि.मी. वर आहे.
  • पुणे येथील गांधी बस टर्मिनस वरून थेऊरला पी.एम.टी. जाते.
  • पुणे- चोराची आळंदी या एस.टी. गाडीनेही थेऊरला जाता येते.
  • पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर पुण्यापासून १७ कि. मी. अंतरावर लोणी गाव आहे. तेथे उतरून फक्त ५ कि. मी. थेऊर आहे.

श्री चिंतामणी डाव्या सोंडेचा असून पूर्वाभिमुख आहे. मांडी घातलेले आसन आहे. मंदिराचा कळस सोन्याचा मुलामा दिलेला आहे.

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री चिंतामणीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेशभक्त माधवराव पेशवे यांचे देहावसान येथेच झाले. त्यांच्या पत्नी रमाबाई त्यांचेबरोबर सती गेल्या त्यांचे वृंदावन मुळा-मुठेच्या काठावर आहे. चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांनी तपश्चय करून सिद्धि प्राप्त करून घेतल्या होत्या. तेथे त्यांना व्याघ्र स्वरूपात श्री गणेशाचे दर्शन झाले.

 

 

सर्व काही मराठी

सर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप. हे संकेतस्थळ पूर्णतः मराठी च्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहील.

Related Articles

Back to top button